“क्षितिज”

क्षितिजावरती छटा उमटल्या
रंगाची उधळण झाली ग…
काठा काठाने नौका चाले
कमळ खुलवी तळे ग…

पैजण छुम छुम
ठुमकत ताल नाचे ग…
लहरी पाण्याचे तरंग
त्यात प्रतिबिंब बागडे ग…

कुंद दवबिंदू
धुक्यात हरवले ग…
फटीतले कवडसे
डोकावले सारे तेजोमय केले ग…

रुईची लगबग केवढी
मनात केवडा तरला ग…
हिरवळ अल्हादकारक
लवलवत्या तृणात
ऊनमोती चमकती ग…

ध्यास कुणीकडे भास चहुकडे
चाहूल झाली पेरती ग…
ओला वारा अथांग इशारा
पाखरू स्वैर भिरभिरती ग…

अत्तर तरले हवेत उरले
सचैल न्हाली धरती ग…
पाटापाटातले पाणी
खळाळत गाणी गाते ग…

समरस झाले नाते ग…
वाट नवलाईची दाटे ग…
क्षणा क्षणाला वारा हसतो…
भेटवी क्षणाला नव्याने ग…

 

…तेजल कुटरेकर 

© by www.followedmypath.com

 

तुमच्या ह्या कवितेवरच्या प्रतिक्रिया जरुर कळवा  🙂

 

मराठी कट्टा…अवश्य भेटा  – “DISCOVER CONTENT IN ARCHIVES ” मध्ये अश्या अजून काही मराठी  कवितांच्या खजिन्याला नक्की भेट द्या

 

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...

Leave a Reply