तुझा सहवास…💖

शरदेच्या रात्री…

तुझा सहवास भिजला

मनातल्या कळ्यांना

बहर मनी रुजला…

 

ओठ थरथरले…

उमटले चार शब्द

पहाटेला नवीन गोष्ट

लिहिलेली…

 

सारे मोकळे आलबेल…

दोन जीवांचा स्तब्ध क्षण

जगून पाहिले

आरस्पानी…

 

कुशीत पहुडलेली…

घट्ट मिठी

वेळेला आजची हूल

दोघांना सापडलेली…

 

मंद स्मितहास्य…

अगणित श्वास अधोरेखित

स्पर्श किमयागार

ओळखलेला…

 

मी भिजले भिजले…तुझ्या प्रेमात प्रेमात…

शरदेचे चांदणे…तुझा सहवास…💖

 

 

…तेजल कुटरेकर 

© by www.followedmypath.com

 

तुमच्या ह्या कवितेवरच्या प्रतिक्रिया जरुर कळवा  🙂

 

मराठी कट्टा…अवश्य भेटा  “DISCOVER CONTENT IN ARCHIVES ” मध्ये अश्या अजून काही मराठी  कवितांच्या खजिन्याला नक्की भेट द्या

 

 

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...

Leave a Reply